उत्तर भारतात थंडीची लाट; सकाळपासून महाराष्ट्रही गारठला, धुळ्यात सर्वात कमी ५.५ अंश तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:12 AM2021-12-20T11:12:22+5:302021-12-20T11:13:07+5:30
उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम सोमवारी सकाळपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे
पुणे : उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम सोमवारी सकाळपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. राज्यात धुळे येथे सर्वात कमी किमान तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तसेच नागपूर येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे.
उत्तर भारतातील थंड वारे राज्यात येऊ लागल्याने पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुणे शहरातील किमान तापमान हे १० अंशाच्या खाली जाण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली उतरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील काही प्रमुख शहरात सोमवारी सकाळी नोंदविण्यात आलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ११.२, पाषाण १०.९, धुळे ५.५, नागपूर ७.८, अकोला ११.३, अमरावती ८, बुलढाणा १०.५, ब्रम्हपूरी १०, चंद्रपूर ११.४, गोंदिया ८.२, वर्धा ९, गडचिरोली ११.६, अहमदनगर १०.१, महाबळेश्वर १२.३, कोल्हापूर १५.७, नाशिक ११.४, सांगली १३.८, मालेगाव १५, सातारा १२, मुंबई २१.४, हर्णे २०.५, डहाणु १८.६, रत्नागिरी १७.६.