जळगाव राज्यात सर्वात थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 AM2021-02-11T04:12:28+5:302021-02-11T04:12:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विदर्भात बऱ्याच भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विदर्भात बऱ्याच भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ९ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. पुण्यात ९.२ अंश तापमानाची नोंद झाली.
कोकणातील बऱ्याच भागात किमान तापमान ४ ते ५ अंशाने घसरले आहे. मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून शुक्रवारपासून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ९.२, मुंबई १९.५, सांताक्रुझ १६.६, रत्नागिरी १८.१, पणजी १९.४, डहाणू १७.१, जळगाव ९, कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १४.९, मालेगाव १२.६, नाशिक ९.७, सांगली १४.३, सातारा ११.७, सोलापूर १४.९, उस्मानाबाद १३.८, औरंगाबाद ११.६, अकोला ११.६, अमरावती १२.५, बुलढाणा ११.५, ब्रह्मपुरी ११.८, चंद्रपूर ११.८, गोंदिया १०.२, नागपूर ११.७, वाशिम १३.२, वर्धा १२.