थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांच्या पिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 12:37 AM2019-02-06T00:37:09+5:302019-02-06T00:37:24+5:30

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

Colds hit the grapes due to the cold winter season | थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांच्या पिकांना फटका

थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांच्या पिकांना फटका

Next

राजुरी  - जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

जुन्नर तालुक्यात बागायती शेती करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांबरोबरच खरीप हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा, कांदा, लसूण यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी पंधरा वर्षांनंतर प्रथमच विक्रमी थंडी पडली आहे. याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये पिंपळवंडी परिसरात नगदी पीक असणारे द्राक्ष पिकाची १५० एकरवर शेतकºयांनी लागवड केली आहे.

थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या आकारात फरक पडला असून, त्यांच्या फुगवण्या थांबले आहेत. तसेच त्यांच्यामध्ये शर्करेचे प्रमाण पण अत्यंत अल्प आहे. यामुळे द्राक्षाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळत आहे.
तसेच व्यापाºयांनी स्वत:चा ग्रुप करून शेतकºयांकडून द्राक्षे खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे, द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. यामुळे सध्या द्राक्षाचा भाव फक्त ५० रुपये किलो झाल्यामुळे, द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. अशीच अवस्था ३00 एकरांवर लावलेल्या केळी या पिकाची झाली असून, केळीचे फन पिवळे पडले असून, त्याच्यावर करपा रोगाने अतिक्रमण केले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी या पिकाची लागवड केली असून, थंडीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
तालुक्यामध्ये सुमारे २ हजार एकरांवर शेतक-यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. थंडीमुळे डाळिंबाच्या फळबागेतील गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. असे जरी असले तरी, सर्वसामान्यांना हुडहुडी भरवणारी थंडी गहू, हरभरा, लसूण, कांदा या खरीप पिकांना मात्र वरदान ठरणार आहे.

थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षमण्याच्या आकारमानात घट झाली आहे. झाडांचा विकास होत नाही तसेच मनी क्रॅक होण्याचे प्रमाण वाढणार आहे यामुळे द्राक्षाला वजन नाही. या सर्वांचा परिणाम द्राक्षाच्या बाजारभावावर होणार आहे.
- ज्ञानेश्वर शेळके प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, राजुरी

खरीप पिकांना वरदान ठरणारी थंडी मात्र इतर पिकांना नुकसानकारक असून, याचा काही पिकांवर दूरगामी परिणाम होणार असून, शेतकºयांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
- संजय भुजबळ, अध्यक्ष, जुन्नर तालुका शेतकरी संघटना

Web Title: Colds hit the grapes due to the cold winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.