कळम येथे चार टन निर्माल्य गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:17+5:302021-09-21T04:12:17+5:30
कळंब येथे माजी सभापती वसंतराव भालेराव आणि उषाताई कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जनाचे नियोजन कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने घोड ...
कळंब येथे माजी सभापती वसंतराव भालेराव आणि उषाताई कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जनाचे नियोजन कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने घोड नदीकाठावरील घाटावर करण्यात आले होते. कळंब ग्रामपंचायत, मंचर ग्रामपंचायत, रोटरी क्लब मंचर आणि मंचर पोलीस ठाण्याच्या संयुक्तपणे राबविलेल्या उपक्रमादरम्यान चार टन निर्माल्य गोळा झाले. जमा झालेल्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन घोड नदीपात्रात करण्यात आले असल्याची माहिती सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी दिली आहे. उद्योजक नितीन भालेराव यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून ग्रामपंचायत कर्मचारी, रोटरी क्लबच्या सदस्यांच्या आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने गणपती मूर्तींचे विसर्जन आणि निर्माल्य गोळा करण्याचे कामाचे चोख व योग्य नियोजन केले. घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य असे नियोजन करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांनी भेट देऊन पाहणी केली.कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राजश्री भालेराव,उपसरपंच डॉ.सचिन भालेराव,ग्रामपंचायत सदस्य भरतदादा कानडे,उद्योजक नितीन भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल श्रीशेटे,अरुण कानडे ,युवराज भालेराव,योगेश मोरे ,गणेश साळवे आदींनी निर्माल्य गोळा करण्याकामी आणि गणेशमूर्ती विसर्जनकामी चोख व्यवस्था पार पाडली. गणपती विसर्जनादरम्यान घाटमाथ्यावर रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण चिखले, सचिव आदिनाथ थोरात,जनार्दन मेंगडे,मयूर पारेख, इंजिनिअर बाळासाहेब पोखरकर,ॲड. बाळासाहेब पोखरकर उपस्थित होते. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कळंब ग्रामपंचायतीकडून पोहण्यात तरबेज असणाऱ्या भोई समाजाच्या मासेमारी करणाऱ्या स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
फोटोखाली: कळंब येथे गणेश विसर्जन दरम्यान निर्माल्य जमा करण्यात आले.