महारक्तदान शिबिरात १ हजार रक्त बाटल्यांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:09+5:302021-03-26T04:12:09+5:30
महारक्तदान शिबिराचे उद्घाटन विरोबा परिवाराचे सर्वेसर्वा बाळासाहेब पाटे, रोहिदास भुजबळ, शांती पटेल, सारिका डेरे, ज्योती दिवटे, रशिद इनामदार,संतोष दांगट,राजेश ...
महारक्तदान शिबिराचे उद्घाटन विरोबा परिवाराचे सर्वेसर्वा बाळासाहेब पाटे, रोहिदास भुजबळ, शांती पटेल, सारिका डेरे, ज्योती दिवटे, रशिद इनामदार,संतोष दांगट,राजेश बाप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, चेअरमन सत्यशील शेरकर, जि.प.सदस्य आशाताई बुचके, पं.स.सदस्य दिलीप गांजाळे, कारखान्याचे संचालक संतोष खैरे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, उद्योजक संजय वारुळे, सुजित खैरे, सरपंच महेश शेळके, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच सुभाष दळवी, उपसरपंच भावेश डोंगरे, डाॅ.सदानंद राऊत, अशोक गांधी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सादिक आतार, दीपक वारुळे, समीर मेहेत्रे, रोहिदास केदारी उपस्थित होते.
या शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी रक्तदान करणार्या सर्व रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने ट्रॅक सुट व प्रमाणपत्र भेट देण्यात आले.
महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे, कार्याध्यक्ष अनिल खैरे, संचालक राजेश बाप्ते, मयूर विटे, नीलेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, गणेश पाटे, ज्योती दिवटे,रुपाली जाधव, अनिता कसाबे, अश्विनी ताजने, कुसुम शीरसाठ, संगीता खैरे, मनीषा मेहेत्रे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, मंदार पाटे, पप्पु टेमकर, अजित वाजगे, ईश्वर पाटे आदींनी मेहनत घेतली.