पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून शिक्रापूर १५५ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:24+5:302021-09-23T04:12:24+5:30
शिक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हे शिबिर झाले. शिक्रापूर पोलीस स्टेशन, शिक्रापूर ग्रामपंचायत, पत्रकार, पोलीस पाटील, महिला दक्षता ...
शिक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हे शिबिर झाले. शिक्रापूर पोलीस स्टेशन, शिक्रापूर ग्रामपंचायत, पत्रकार, पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटी, गणेश मंडळे यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी सरपंच रमेश गडदे , माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, पूजा भुजबळ, सारिका सासवडे, उषा राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, शिवराम खाडे, मुख्याध्यापक दत्तात्रय तांबे, महिला दक्षता कमिटीच्या सदस्या भाग्यश्री गायकवाड, सीमा पवार, छाया सकट, संगीता विकारे, पोलीस पाटील राजेश गायकवाड, जयसिंग भंडारे, प्रकाश करपे, वंदना साबळे यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी रक्तदात्यांना शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने वृक्ष तसेच पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेच्या वतीने सन्मानपत्र देत सन्मानित करण्यात आले असून, महिला दक्षता कमिटीच्या वतीने रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देत अभिनंदन करण्यात आले.
---
फोटो क्रमांक : २२ शिक्रापूर रक्तदान शिबिर
फोटो खालील ओळ – शिक्रापूर येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे.