'पानशेत' च्या महाप्रलयात दिवंगत काका वडके यांनी संग्रहित केलेल्या वृत्तपत्रांच्या कात्रणांचा संग्रह गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:26 PM2021-07-12T12:26:13+5:302021-07-12T12:26:30+5:30
पुनश्च हरिओम करून त्यांनी केली ’पानशेत प्रलय’ पहिला कात्रण संग्रहाची निर्मिती
पुणे: शिवसेनेचे नेते म्हणून परिचित असलेले काका वडके हे एक जातिवंत संग्राहक होते. पुण्याचे ते ख-या अर्थाने’लोकसंग्रहक काका’ होते. त्यांनी संग्रहित केलेली वृत्तपत्रांची अनेक वर्षांची कात्रणे आज अभ्यासकांसाठी एक ठेवाच आहे. लहानपणापासूनच त्यांना कात्रणे जमवण्याचा छंद होता. १२ जुलै १९६१ च्या महाप्रलयात त्यांचा कात्रणांचा संग्रह वाहून गेला. परंतु त्यांनी त्यांची संग्रहक वृत्ती वाहून जाऊ दिली नाही.
त्यानंतर त्यांनी ती अधिकच जोपासली व त्याच दिवसापासून पुनश्च हरिओम करून त्यांनी ’पानशेत प्रलय’ हा पहिला कात्रण संग्रह केला असल्याची आठवण रवी काका वडके यांनी सांगितली.
संग्रह हा त्यांचा छंद आणि आनंद होता, मग तो वृत्तपत्रीय कात्रणं चा असो, दुर्मिळ वस्तूंचा असो, चांगल्या माणसांचा की स्नेही मित्रांचा! संग्रहातून मिळणारा विरंगुळा फक्त आपल्याच मनाला मिळतो असे नाही तर तो संग्रह नीट जतन केला तर त्याचा उपयोग समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे म्हणणे असायचे. वषार्नुवर्ष त्यांनी जपलेला हा संग्रह इतिहासाची संस्कृती काय होती याची प्रचिती कायम देत राहील असेही त्यांनी सांगितले.