जमविला दुर्मिळ नाणी, नोटांचा संग्रह
By admin | Published: April 16, 2015 01:03 AM2015-04-16T01:03:39+5:302015-04-16T01:03:39+5:30
नाण्यांबरोबरबरीनेच चुकीच्या पद्धतीने छापलेली तसेच बनावट नाणी अशा अत्यंत आकर्षक वस्तूंचा संग्रह विक्रमादित्य बनवण्याचा मान अभिजीत धोत्रे या कलाशिक्षकाला मिळाला आहे.
पुणे : ऐतिहासिक काळातील राजारजवाड्यात वापरलेले अनोखे चमचे, ब्रिटीश काळापासूनचे कॅमेरे व त्याचे रोल, विविध प्रकारच्या नाण्यांबरोबरबरीनेच चुकीच्या पद्धतीने छापलेली तसेच बनावट नाणी अशा अत्यंत आकर्षक वस्तूंचा संग्रह विक्रमादित्य बनवण्याचा मान अभिजीत धोत्रे या कलाशिक्षकाला मिळाला आहे.
लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकाचवेळी या वैविध्यपूर्ण संग्रहाची नोंद झाली असल्याचे धोत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सायकल कंपनीचा पोको, १९९२मधील बेलो, हनीकॉंग, एरो कंपनीचा मायक्रो कॅमेरा, हिटलरने दुसऱ्या महायुद्धात हेरगिरीसाठी वापरलेला याशिका कंपनीचा कॅमेरा, स्पाय कॅमेरा, लायटर, डेकोकलर, चावीवर चालणार शूटिंगसाठी वापरला जाणारा सिनेकोडॅक असे विविध प्रकारचे चालू स्थितीतील कॅमेरे धोत्रे यांच्या संग्रहात पहायला मिळतात.
तसेच, या कॅमेऱ्यात कॅप्चर केलेले इंदिरा गांधींसारख्या व्यक्तिमत्त्वाचे कृष्णधवल फोटोही धोत्रे यांना मिळाले आहेत. कलाशिक्षक असलेलेल अनिल धोत्रे यांनी मुलाकडून प्रेरणा घेऊन विविध दूरध्वनींच्या संग्रहास सुरवात केली. त्यांच्या संग्रहात बुलेटपासून हरीण-घोडा प्राण्यांच्या आकारातील दूरध्वनी, टायटॅनिक चित्रपटामध्ये वापरला गेलेला दूरध्वनी, फोल्डेबल, पिगी फोन, सफरचंद, कोका कोला बाटली अशा गंमतीशीर आकाराचे आणि पद्धतीचे २३० फोन अनिल धोत्रे यांनी आत्तापर्यंत संग्रहित केले आहेत.
(प्रतिनिधी)