दीड महिन्यात साडेदहा हजार रक्तपिशव्यांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:33+5:302021-05-25T04:11:33+5:30
लसीकरणानंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी समर्थ भारतच्या वतीने १ एप्रिल ते १५ मे या दरम्यान विविध सामाजिक ...
लसीकरणानंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी समर्थ भारतच्या वतीने १ एप्रिल ते १५ मे या दरम्यान विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण शंभर शिबिरे घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एकशे दहा शिबिरे पार पडली. शिबिरासाठी एकूण १५ हजार ३४७ स्त्री-पुरुषांनी नोंद केली होती. या शिबिरात मातृशक्ती आणि युवा शक्तीचा सहभाग उल्लेखनीय होता.
‘समर्थ भारत’चे संयोजक महेश मानेकर यांनी सांगितले, “लसीकरणा दरम्यानच्या रक्त तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी व्यापक स्तरावर रक्तदान शिबिरे घेतली. विविध गणेश मंडळे, ज्ञाती संस्था, शिक्षण संस्था यांच्या सहकार्यातून शहरभर ११० शिबिरे पार पडली. प्रत्यक्षात शंभर शिबिरांचेच नियोजन होते, मात्र पुणेकरांनी सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रेष्ठ दानातली सामाजिक जबाबदारी पुणेकरांनी लीलया पेलली आहे.”
चौकट
एकूण रक्तपिशवी संकलन - १०५२८
सहभागी रक्तपेढी – २०
सहभागी संस्था
सामाजिक - ९८
शिक्षण - १०
विविध राजकीय पक्ष - ३
-----