जैविक रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुन्याचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:09+5:302021-05-17T04:09:09+5:30
यंदाही पावसाळ्यापूर्वी पाण्याचे नमुने घेण्यात आले असून २१ मे पर्यंत हे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतरच १० ...
यंदाही पावसाळ्यापूर्वी पाण्याचे नमुने घेण्यात आले असून २१ मे पर्यंत हे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतरच १० दिवसांत त्याचे रिपोर्ट प्राप्त होतात. यात तळेघर प्रा. आ. केंद्राअंतर्गत येणारी जांभोरी, कुशिरे बु., पाटण , पोखरी व तेरूंगण या उपकेंद्रामधील २० गावे व वाडी वस्त्यावरील एकूण ५१ स्रोतांचे पाणी नमुने घेण्यात आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढेकळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेशकुमार बिरारी, डॉ. गिरीश उभे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक धनंजय घोसाळकर, बबन राजगुरव, आरोग्यसेवक सुधाकर मिडगुले, शशिकांत थोरात, शिवाजी बांगर, सचिन पारधी व तायप्पा कोळी यांनी काम केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
‘‘पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे नमुने संकलित केले जात असून २१मे नंतर अहवाल प्राप्त होणार आहेत." - डॉ. धनंजय घोसाळकर
पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे मॅपिंग करण्यासाठी नमुने घेताना आरोग्य कर्मचारी.