पीएमआरडीएच्या आरक्षणावर सामूहिक हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:14+5:302021-09-19T04:12:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : ग्रामस्थांकरिता ग्रामपंचायतीने पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात आरक्षणात बदल सुचवून सामूहिक हरकत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : ग्रामस्थांकरिता ग्रामपंचायतीने पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात आरक्षणात बदल सुचवून सामूहिक हरकत नोंदविल्या आहेत.
नसरापूर ग्रोथ सेंटर असल्याने नसरापूर ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेत ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आराखड्याबाबत हरकती, सूचना व बदल गावपातळीवर एकाच छत्राखाली पीएमआरडीए कार्यालयात सादर केल्या. ग्रामपंचायतीच्या वतीने पीएमआरडीएच्या नसरापूर येथील कार्यालयात या सामूहिक हरकती देण्यात आल्या. या वेळी सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, ग्रामविकास अधिकारी एच. जे. पवार, सदस्य नामदेव चव्हाण, संदीप कदम, इरफान मुलाणी, सुधीर वाल्हेकर, य़शवंत कदम, विक्रम कदम, रवींद्र शेडगे, अलका शेडगे, उत्तम निकम आदी उपस्थित होते.
विकास आराखड्यात सार्वजनिक सेवा-सुविधा देण्यासाठी अनेक जागांवर आरक्षण जाहीर केले आहेत. या वेळी नागरिकांच्या हरकती नोंदविताना पर्यायी जागा किंवा कमी आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने मांडला आहे. प्रस्तावित अनेक रस्त्यांची रुंदी कमी करणे, काही रस्ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर नसरापूर गावाठाणाची वाढ लेंडी ओढ्यापासून पुढे सातारा-पुणे महामार्ग क्र.४८ पर्यंत दोन्ही बाजूने पूर्व-पश्चिमेस वाढ करावी. लेंडी ओढा ते महामार्ग क्र.४८ पर्यंत नकाशामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करून टुरिझम झोन हा रहिवासी झोन करावा, पर्यटनस्थळ श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिरालगत असलेला कचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येऊन प्ले ग्राउंडसाठीचे आरक्षण गट क्र. ८७ ऐवजी २२७ मध्ये घ्यावे व अग्निशमन केंद्राचे आरक्षण गट क्र. २३४, २४० ऐवजी २३१ मध्ये घेण्यात यावे अशा आदी मागण्या ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्या.
सोबत फोटो व ओळ : नसरापूर (ता. भोर) येथे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना हरकतीचे पत्र देताना ग्रामपंचायत पदाधिकारी.
180921\img-20210917-wa0033.jpg
सोबत फोटो व ओळ : नसरापूर ( ता. भोर) येथे पी एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांना हरकतीचे पत्र देताना ग्रामपंचायत पदाधिकारी.