जिल्हाधिका:यांकडून विद्याथ्र्याचे कौतुक
By admin | Published: November 22, 2014 11:21 PM2014-11-22T23:21:59+5:302014-11-22T23:21:59+5:30
एक दिवस शिक्षणासाठी’ या उपक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी येथे भेट दिली.
Next
पुणो : पुणो जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणा:या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ‘एक दिवस शिक्षणासाठी’ या उपक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी येथे भेट दिली. त्यांनी शाळेतील इ. तिसरी, चौथी, पाचवी व सातवी या वर्गातील विद्याथ्र्याच्या गुणवत्तेची प्रश्नोत्तर रुपाने चाचपणी केली. गुणवतेबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
शालेय परिपाठापासून जिल्हाधिकारी राव कामकाजात सहभागी झाले होते. विद्याथ्र्याशी संवाद साधून विद्याथ्र्यामधील प्रतिभा, जिज्ञासा, आत्मविश्वास या गुणांचे मनापासून कौतुक केले. परिपाठात सादर केलेल्या स्वच्छतेविषयीच्या पथनाटय़ाचा त्यांनी आनंद घेतला. प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यावर शाळेतील स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, संगणक कक्ष, ई-लर्निग प्रोजेक्टर यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शाळेत चालू असणा:या अेबीएल उपक्रमाची प्रत्यक्ष विद्याथ्र्याकडून कार्ड सोडवून घेवून चाचपणी केली. त्याप्रमाणो संगणक कक्षात विद्याथ्र्यानी संगणकावर दाखविलेली प्रात्यक्षिक पाहून आनंद व्यक्त केला. सदर कार्यक्रमाला मावळ तालुक्याचे तहसीलदार शरद
पाटील, गटशिक्षणाधिकारी
संजय तांबे, शालेय पोषण
आहार योजनेचे चंद्रकांत भोते, गावचे तलाठी तसेच ग्रामसेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)
खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीसुद्धा कुठेही कमी नाहीत. विद्याथ्र्यामधील प्रतिभा, जिज्ञासा, आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी.