‘शब्दसारथी’त रंगली काव्य मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:28+5:302021-01-04T04:09:28+5:30
पुणे : अनौपचारिक गप्पांच्या ओघात कवितांची एक सुंदर मैफल गुंफत गेली आणि काव्यरसिकांना शब्दानंदाची सुखद अनुभूती मिळाली. निमित्त होते ...
पुणे : अनौपचारिक गप्पांच्या ओघात कवितांची एक सुंदर मैफल गुंफत गेली आणि काव्यरसिकांना शब्दानंदाची सुखद अनुभूती मिळाली. निमित्त होते ‘शब्दसारथी’च्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन मुलाखतीचे.
‘कोरोनाच्या कचाट्यात कवी’ या विषयावर प्रख्यात कवी अरुण म्हात्रे यांच्याशी संवाद साधला. कवयित्री वैशाली मोहिते यांनी ही मुलाखत घेतली. संयोजन शब्दसारथीचे संस्थापक संचालक पराग पोतदार यांनी केले. कोरोना प्रसाराच्या काळात अवघे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरचा सगळा काळ त्यांनी मुलाखतीतून उलगडालाच पण एक सर्जनशील कवी या बदलत्या जगातील अवस्थान्तराकडे कसं पाहतो हेही त्यांनी सांगितले. स्वतःच्या जडणघडणीचा काळ सांगतानाच कवितेचा प्रवाह कसा बदलत गेला यावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्याचबरोबर, अनेक नामवंत कवींच्या कविता खास शैलीत सादर करून रसिकांना आनंद दिला. कोरोनाच्या काळात तयार केलेल्या दोन कविता त्यांनी यानिमित्ताने उपस्थित रसिकांसमोर सादर केल्या. ही मुलाखत पाहण्यासाठी सातारा, नाशिक, पुणे मुंबई, कोल्हापूर या शहरांतून अनेकानेक रसिक उपस्थित होते.