कोलंबी ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:10+5:302021-02-24T04:11:10+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने वेल्हे तालुक्यातील कोलंबी, घोल, दापोडे या तीन ग्रामपंचायतींना गावांना स्मार्टग्राम पुरस्कार गौरविण्यात आले. कोलंबी ग्रामपंचायतीच्या ...
जिल्हा परिषदेच्या वतीने वेल्हे तालुक्यातील कोलंबी, घोल, दापोडे या तीन ग्रामपंचायतींना गावांना स्मार्टग्राम पुरस्कार गौरविण्यात आले. कोलंबी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक नितीन ढुके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दहा लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आमदार सुनील शेळके, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपस्थित होते.
ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्रित येते शासनाच्या आलेल्या विविध योजनांची गावामध्ये प्रभावी अंमलबजावणी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहचल्याने आणि या योजनांचा लाभ घेऊन विकासकामेदेखील वेळेत पूर्ण केल्याने हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे ग्रामसेवक नितीन ढुके यांनी सांगितले.
२३ मार्गासनी पुरस्कार
अजित पवार यांच्या हस्ते तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार स्वीकारताना ग्रामसेवक नितीन ढुके.