पुणे पोलिसांमार्फत अवैध धंद्यांविरोधात 'कोंबिंग ऑपरेशन'; तब्बल ४६६ आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 09:06 PM2021-01-29T21:06:47+5:302021-01-29T21:07:12+5:30

एकूण 46 हजार 550 रुपये किंमतीचा माल जप्त

'Combing operation' against illegal trades by police in Pune city; As many as 466 accused arrested | पुणे पोलिसांमार्फत अवैध धंद्यांविरोधात 'कोंबिंग ऑपरेशन'; तब्बल ४६६ आरोपींना अटक 

पुणे पोलिसांमार्फत अवैध धंद्यांविरोधात 'कोंबिंग ऑपरेशन'; तब्बल ४६६ आरोपींना अटक 

Next

पुणे : शहरातील पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकत्रितपणे राबविलेल्या 'कोंबिग ऑपरेशन' अंतर्गत सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर गुरुवारी ( दि.२८) प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. या आरोपी चेकींग अभियानमध्ये परिमंडळ निहाय पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकूण 2036 गुन्हेगार तपासले.  त्यापैकी 705 गुन्हेगार सापडले असून, प्रतिबंधक कारवाईच्या 480 केसेस करून 466 आरोपींना अटक करण्यात आली आहे.      

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी परिमंडळीय पोलीस उप आयुक्त व पोलीस उप आयुक्त गुन्हे यांना पुणे शहरात गुन्हेगार चेकींग योजना राबवून गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.२८) ७ ते ११ दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये 466 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एकूण 46 हजार 550 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. 
.......

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस सहआयुक्त रविंद्र शिसवे, गुन्हे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिटचे पो.नि व त्यांचे पथकाने कारवाई केलेली आहे. यापुढेही कोंबिंग ऑपरेशन  राबविण्यात येवून शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: 'Combing operation' against illegal trades by police in Pune city; As many as 466 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.