बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कोम्बिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:59+5:302020-11-22T09:37:59+5:30
\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ५८ कुंटणखान्यांची झाडाझडती ...
\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ५८ कुंटणखान्यांची झाडाझडती घेऊन ४४ व्यक्तींना ताब्यात घेत त्यांचे ओळखपत्र, वाहने आणि गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
पोलिस उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचा कलावधी संपल्यानंतर बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मोठ्या प्रमाणत गर्दी वाढली होती. यामध्ये सराईत गुन्हेगारांचाही समावेश होता. सराईत गुन्हेगारांच्या वावरामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता होती. सराईत गुन्हेगारांच्या वावरा बद्दल उपायुक्त डॉ. नारनवरे यांना माहिती मिळताच त्यांनी नाकाबंदी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानूसार महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचा वापर करुन सात ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ही नाकाबंदी बुधवार पेठेतील एंट्री व एक्झिट परिसरात केली गेली. यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या किंमती ऐवजावर डोळा असलेल्या गुन्हेगारांना चाप बसला. तर दुसरीकडे वेश्यावस्तील अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असतो, याला प्रतिबंध घालण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, 25 पोलिस अंमलदार तसेच आरपीसी व सीआर मोबाईल प्रत्येकी एक सहभागी झाले होते. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कोहिनूर बिल्डींग, शांता बिल्डींग, नवीन सागर बिल्डींग, ताजमहल बिल्डींग आदी ठिकाणचे 58 कुंटणखाने तपासण्यात आले. तेथे सापडलेल्या 44 व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई केली गेली.
......
चौकट
नियमभंग करणा-या हॉटेल व्यवसायिकांवर कारवाई
परिमंडळ एकच्या हद्दीत नियमभंग करीत नियमित वेळेपेक्षा जास्त वेळा उघड्या असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. यामध्ये डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत 360 डिग्री, झेड ब्रिज जवळील चौपाटी, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल सुदामा यांच्यावर अटी व शर्थींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
.....