चला, करूया घराची स्वप्नपूर्ती

By admin | Published: February 25, 2015 11:55 PM2015-02-25T23:55:31+5:302015-02-26T00:06:38+5:30

‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’: शनिवारी, रविवारी होणार प्रदर्शन

Come on, dream of doing a house | चला, करूया घराची स्वप्नपूर्ती

चला, करूया घराची स्वप्नपूर्ती

Next

कोल्हापूर : महाराष्ट्र व गोव्यामध्ये अग्रणी असलेल्या ‘लोकमत’ समूहाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या व भव्य अशा ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’ या गृह प्रदर्शनाचे शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) व रविवारी (दि. १ मार्च) कोल्हापुरात आयोजन केले आहे. येथील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन होईल. यात पुणे आणि कोल्हापुरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प पाहता येणार आहेत. या गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे.
प्रदर्शनात एकाच छताखाली पुण्यासह कोल्हापुरात सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या गृहप्रकल्पांची सहजपणे माहिती मिळणार आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्व स्तरांतील ग्राहकांसाठी घर निवडण्याचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. अगदी ‘वन बीएचके’पासून प्रीमियम लक्झुरिअस फ्लॅट, रो हाउस, बंगलो, फ्लॅटपर्यंत तसेच पुणे आणि कोल्हापूर शहरांतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक मिळकतींचे प्रकार येथे पाहता येतील. गेल्या वर्षीदेखील हे प्रदर्शन झाले. त्याला अनेक नागरिकांनी भेट दिली. शिवाय आपल्या स्वप्नातील घर निश्चित केले. या प्रदर्शनानिमित्त मिळणाऱ्या विशेष सवलतीतील दरांचाही फायदा मिळणार आहे. कोल्हापूरकरांना त्यांच्या स्वत:च्या परिसरातील, जवळील गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. स्वप्नातील घराची पूर्तता करण्याची योग्य वेळ ‘लोकमत’ने या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली असल्याची माहिती संयोजकांनी दिली. (प्रतिनिधी)


तासाला जिंका
चांदीची नाणी...
हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रत्येक तासाला एक ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यातील भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी दिली जाणार आहेत.

वेळ, पैसा वाचवा...
आपल्या स्वप्नातील घराची पूर्तता करण्याबाबतचे एकमेव उत्तर ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१५’ हे प्रदर्शन आहे. यात पुणे, कोल्हापुरातील अनेक गृहप्रकल्प एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांची वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

Web Title: Come on, dream of doing a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.