पुणेकरांसाठी हास्य मैफिलीची मेजवानी
By Admin | Published: March 2, 2016 01:17 AM2016-03-02T01:17:51+5:302016-03-02T01:17:51+5:30
पुणेकरांना प्रसिद्ध कॉमेडियन सौरभ पंत याच्या हास्य मैफिलीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. पूना राऊंड टेबल १५ आणि ‘लोकमत’तर्फे गुरुवारी (दि. ३ मार्च) ‘लाफ नाईट’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले
पुणे : पुणेकरांना प्रसिद्ध कॉमेडियन सौरभ पंत याच्या हास्य मैफिलीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. पूना राऊंड टेबल १५ आणि ‘लोकमत’तर्फे गुरुवारी (दि. ३ मार्च) ‘लाफ नाईट’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीतून राऊंड टेबल या सामाजिक संस्थेच्या ‘फ्रीडम थ्रू एज्युकेशन’ या उपक्रमांतर्गत बांधण्यात येणाऱ्या शाळेसाठी निधी उभा केला जाणार आहे.
देशात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राऊंड टेबल इंडिया’ या संस्थेने ‘फ्रीडम थ्रू एज्युकेशन’ ही मोहीम हाती घेतली आहे. मागील १५ वर्षांत या मोहिमेअंतर्गत देशाच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १,८०० शाळा बांधल्या आहेत. शाळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करून देणे, हे संस्थेच उद्दिष्ट आहे. आतापर्यंत या कामासाठी तब्बल १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जगभरातील नामांकित उद्योगांचेही संस्थेला सहकार्य मिळत आहे.
‘पूना राऊंड टेबल १५’चे अध्यक्ष अभिषेक मोरे, सचिव देवेश जैन, प्रकल्प समन्वयक हर्निश ठक्कर, कीर्ती रुईया, कपिल शहा आणि प्रशांत बंब हे या मैफिलीचे संयोजक आहेत.
(प्रतिनिधी)