दिलासा... २ हजार ९८५ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:23+5:302021-05-17T04:09:23+5:30
पुणे : शहरात रविवारी दिवसभरात केलेल्या ११ हजार ५५३ तपासण्यांपैकी १ हजार ३१७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तपासणीच्या ...
पुणे : शहरात रविवारी दिवसभरात केलेल्या ११ हजार ५५३ तपासण्यांपैकी १ हजार ३१७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ११.३९ टक्के इतकी आहे़
आज दिवसभरात २ हजार ९८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. सध्या शहरात २० हजार ५८९ सक्रिय रूग्ण आहेत. शहरात शुक्रवारी ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २६ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६७ टक्के आहे़
शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ५९४ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४१५ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ६४ हजार १७२ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ४ लाख ५९ हजार ३०३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ३१ हजार ८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७०६ जणांचा मृत्यू झाला आहे़