दिलासा! महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात घटले कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:30+5:302021-09-15T04:13:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हॉटस्पॉट आणि क्रियाशील कंटेन्टमेंट झोनमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना, धडक सर्वेक्षण आणि वाढते लसीकरण यामुळे पुणे ...

Comfort! Municipal, municipal area decreased corona | दिलासा! महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात घटले कोरोनाबाधित

दिलासा! महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात घटले कोरोनाबाधित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हॉटस्पॉट आणि क्रियाशील कंटेन्टमेंट झोनमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना, धडक सर्वेक्षण आणि वाढते लसीकरण यामुळे पुणे आणि पिंपरी महानगरपालिकेबरोबर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या नगरपालिका क्षेत्रातही कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा दर आटोक्यात आहे. निर्बंध शिथिल केल्यावरही रुग्णवाढीचे प्रमाण कमी असल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांत राज्यात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात निर्बंध शिथिल केल्यावरही बाधितांचा आकडा नियंत्रणात आहे. चार महिन्यांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आणि नगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंंट झोन तयार करण्यात आले होते. रुग्णांचा संसर्ग कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्या होत्या. रुग्णवाढ आटोक्यात असल्याने निर्बंध उठवण्यात आले. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही निर्बंध उठवण्यात आले. सणासुदीच्या खरेदीसाठी माेठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले. यामुळे पुन्हा रुग्णवाढ होणार अशी शंका आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली होती. तसेच तिसऱ्या लाटेचीही भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधित दर हा स्थिर राहिला आहे. एवढंंच नाही तर नगरपालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या ही नियंत्रणात आली आहे.

गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबरला पुण्यात २०० तर पिंपरी चिंचवड शहरात १८३ रुग्ण आढळले होते. १० तारखेला पुण्यात २४१ तर पिंपरीत १८४ रुग्ण होते. यानंतर या संख्येत सातत्याने घट झाली. ११ तारखेला पुण्यात १३४ तर पिंपरी चिंचवड शहरात ११२ रुग्ण आढळले. सोमवारी (दि. १३) पुण्यात केवळ १०७ तर पिंपरीत १२० रुग्ण आढळले.

१४ नगरपालिकांमध्ये सध्या बारामती तालुक्यात सर्वाधिक २३७, तर राजगुरूनगर नगरपालिका हद्दीत ११० रुग्ण आहेत. तर भोर नगरपालिकेत १३, आळंदी ९, चाकण २६, दाैंड ४५, इंदापूर ८२, जेजुरी १३, लोणावळा १८, सासवड ८४, शिरूर २८, तळेगाव दाभाडे ८५, वडगाव मावळ नगरपालिकेत १४ असे एकूण ७८७ रुग्ण नगरपालिका क्षेत्रात आहेत.

चौकट

कटक मंडळातही रुग्णसंख्या घटली

कटक मंडळातही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. देहू कटक मंडळ हद्दीत सध्याच्या घडीला १२, खडकी कटक मंडळात १३ तर पुणे कटक मंडळ हद्दीत ३५ असे एकूण केवळ ६० रुग्ण असून, त्याच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

कोट

जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यावर रुग्ण वाढतील, असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता. असे असले तरी जिल्ह्यात ही रुग्णवाढ सध्या आटोक्यात आहे. धडक सर्वेक्षण आणि वाढलेले लसीकरण याचा फायदा रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी झाला आहे.

-भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Comfort! Municipal, municipal area decreased corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.