दिलासा... सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:23+5:302021-05-07T04:11:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली तरी सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण ...

Comfort ... For the sixth day in a row, the number of people recovering from injuries is higher | दिलासा... सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

दिलासा... सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली तरी सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी दिवसभरात २ हजार ९०२ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात २ हजार ९८६ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयांतील १,४१४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५८२ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ५७१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६६ मृतांची नोंद केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार १८४ झाली आहे. पुण्याबाहेरील २० मृत्यूची नोंद केली आहे.

दिवसभरात एकूण २ हजार ९८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ लाख ९२ हजार ४८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ३९ हजार २५१ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३९ हजार ५८२ झाली आहे.

--

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १८ हजार ८६२ नागरिकांची स्वॅब तपासणी केली आहे. आतापर्यंत २२ लाख २९ हजार १०० रुग्णांची तपासणी केली आहे.

Web Title: Comfort ... For the sixth day in a row, the number of people recovering from injuries is higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.