नाट्यगृहांच्या स्वच्छतेच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:45+5:302020-11-22T09:39:45+5:30

पुणे : महापालिकेने नगर रचना विभागातर्फे निविदा काढून चार प्रमुख नाट्यगृहांच्या स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली आहे. बालगंधर्व रंगमंदिरमधील फुटलेल्या ...

Commencement of cleaning of theaters | नाट्यगृहांच्या स्वच्छतेच्या कामास सुरुवात

नाट्यगृहांच्या स्वच्छतेच्या कामास सुरुवात

Next

पुणे : महापालिकेने नगर रचना विभागातर्फे निविदा काढून चार प्रमुख नाट्यगृहांच्या स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली आहे. बालगंधर्व रंगमंदिरमधील फुटलेल्या टाईल्स बदलण्यापासून ते मेकअप रूम, स्वच्छतागृहाची दुरूस्ती तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची संपूर्ण साफसफाई केली जात आहे. आठ महिने बंद अवस्थेत असलेली नाट्यगृहे वास जाण्याकरिता खुली ठेवण्यात आली आहेत.

शासनाने 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र विधानपरिषदेच्या आचारसंहितेचा फटका नाट्यगृहांच्या सफाई कामांना बसला. आचारसंहितेमुळे नाट्यगृहांच्या सफाई, पार्किंग, कँटिंग ची निविदा प्रक्रिया रखडली. त्यामुळे नाट्यगृहांमध्ये प्रयोग करायचे कसे? असा प्रश्न निर्माते आणि व्यवस्थापकांना पडला. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नाट्यगृहांची साफसफाई होणे आवश्यक आहे. याबाबत निर्माते आणि कलाकार मंडळींनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा वारंवार प्रयत्न केला. अखेर महापालिकेने याची गांभीर्याने दखल घेत नगर रचना विभागातर्फे साफसफाईची निविदा काढून नाट्यगृहांच्या अंतर्गत दुरूस्तीच्या कामास सुरूवात झाली असल्याची माहिती बालगंधर्व रंगमंदिराचे प्रमुख व्यवस्थापक सुनील मते यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून मशिन लावून नाट्यगृहांची साफसफाई केली जात आहे. टाईल्स बदलणे, पत्रे काढून परत बसवणे, नाट्यगृहांच्या फरशा पाणी टाकून पुसून घेणे अशी कामे प्रकर्षाने हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नाट्यगृहात प्रयोग लावण्यासाठी अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही विचारणा झाली नसल्याचे ते म्हणाले.

-----------------------------------------------

Web Title: Commencement of cleaning of theaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.