वर्षभर रखडलेल्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:20+5:302021-04-05T04:10:20+5:30
धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा या गावांतील नागरिकांना व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मंचर येथे १५ ते २० किलोमीटर अंतरावरून जारकरवाडीमार्गे यावे ...
धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा या गावांतील नागरिकांना व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मंचर येथे १५ ते २० किलोमीटर अंतरावरून जारकरवाडीमार्गे यावे लागते. वरील गावातील रहिवाश्यांना हेच अंतर पहाडदरा-हिंगेवस्ती मार्गे १० किलोमीटर कमी होते. मात्र रस्ता मुरुमाचा असल्याने वाहनचालकांना १५ ते २० किलोमीटर अंतरावरून यावे लागत होते. स्थानिक रहिवाशी यांनी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ कोटी ६५ लाख मंजूर करून मंचर - पारगाव रस्ता ते पहाडदरा या ३ किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाला सुरुवात झाल्याने रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले.
हिंगेवस्ती ते पहाडदरा या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण काम चालू आहे. परंतु या रस्त्याच्या साईडपट्ट्यालगत विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी खांब वाहनचालकांना अपघाताला निमंत्रण देणारे ठरणार असल्याने विद्युत वितरण कंपनीने रस्त्याला अडसर ठरणारे खांब तातडीने बदलावेत, अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मंचर-पारगाव रस्ता ते पहाडदरा या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे.