बारामतीत नगरपरिषदेकडून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना सर्वेक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:55+5:302021-03-21T04:09:55+5:30
२१५ पथके, ४३० कर्मचारी करतायेत घरोघरी जाऊन सर्वेक्षण बारामती : बारामती शहरात कोरोना रुग्णांच्या संकेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ...
२१५ पथके, ४३० कर्मचारी
करतायेत घरोघरी जाऊन सर्वेक्षण
बारामती : बारामती शहरात कोरोना रुग्णांच्या संकेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बारामती प्रशासन सतर्क झाले आहे. शुक्रवार (दि.१९) पासून बारामती शहरातल्या सव्वालाख लोकांची घरोघरी जाऊन करून तपासणी करण्याची मोहीम बारामती नगरपरिषदेने हाती घेतली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली.
बारामतीमधील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त करून प्रशासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणेबाबत निर्देश केले आहेत. त्याच अनुषंगाने आज नगरपरिषदेमध्ये ४३० लोकांचे पथक तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रभावी अंमलबजावणी व्दारे कोरोनाबाधित रूग्णांच्या संपकार्तील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निजंर्तुकीकरण करणे, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लस घ्यावी याकरिता जनजागृती करणे अशा उपाययोजना तातडीने करण्याचे सुरू आहेत. बारामती शहरातल्या १९ प्रभागांपैकी ज्या प्रभागांमध्ये कोरणा रुग्णांची संख्या जास्त असेल अशा भागात सर्वेक्षणा ला सुरुवात करण्यात आली आहे. ४३० लोकांच्या पथकामध्ये २ कर्मचारी याप्रमाणे २१५ पथके तयार करण्यात आली आहेत. बारामती शहरातील १९ प्रभागांचे सर्वेक्षण आठवड्याभरात पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरीता दररोज ३० पथकांमार्फत सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. या प्रत्येक पथकांसोबत मदतीकरीता १ स्वयंसेवक देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बारामती शहरातला जवळपास सव्वा लाख लोकसंख्येचे आठवडाभरात तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर ज्या रुग्णांना लक्षणे असतील त्यांना तातडीने सेंटरमध्ये भरती करण्यात येणार आहे
----------------------