परिंचे उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:07+5:302021-07-17T04:10:07+5:30
दिलीप यादव म्हणाले की, परिंचे ग्रामपंचायत उपकेंद्रामुळे परिंचे, सटलवाडी, नवलेवाडी या गावातील लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. परिंचे ...
दिलीप यादव म्हणाले की, परिंचे ग्रामपंचायत उपकेंद्रामुळे परिंचे, सटलवाडी, नवलेवाडी या गावातील लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनी झालेली असून या ठिकाणी दैनंदिन तपासणी तसेच कोरोना तपासणी, बाळंतपण यासाठी विविध गावातून रुग्ण व महिला येत होत्या, त्यांची लसीकरणामुळे गैरसोय होत होती. मात्र उपकेंद्रात लसीकरण सुरू केल्याने त्यांची गैरसोय दूर होणार आहे.
यावेळी माजी सरपंच सोपान राऊत, सुनील शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पूजा तायडे, आरोग्यसेविका वैशाली भगत, आरोग्यसेवक प्रकाश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य पुष्पलता नाईकनवरे, प्रवीण जाधव, गणेश पारखी गट प्रवर्तक तनुजा मुलाणी, आशासेविका दीप्ती अडसूळ, सुरेखा राऊत, नीता जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब दुधाळ आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
--
160721\16pun_1_16072021_6.jpg
फोटो क्रमांक : १६ परिंचे उपकेंद्र लसीकरण फोटो ओळ- परिंचे (ता.पुरंदर) उपकेंद्रात लस घेताना ग्रामस्थ