पुण्यातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम! भुकेल्या श्वानांसाठी स्वखर्चाने रोज देताहेत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:30 PM2021-07-19T18:30:12+5:302021-07-19T18:31:18+5:30

परिसरातील सर्व भटक्या, अनाथ प्राण्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था ते करतात

Commendable activities of the youth of Pune! Meals for hungry dogs are provided daily at their own cost | पुण्यातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम! भुकेल्या श्वानांसाठी स्वखर्चाने रोज देताहेत जेवण

पुण्यातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम! भुकेल्या श्वानांसाठी स्वखर्चाने रोज देताहेत जेवण

Next
ठळक मुद्देसहकारनगर,तळजाईपासून वाळवेकरनगर, टिळकरस्त्यापर्यंत दररोज अंदाजे १५०० भटके श्वान आणि मांजरी यांच्या पोटाची भूक भागवतात

पुणे : कोरोना महामारी निर्बंधाने खरकटे अन्नच रस्त्यावर येत नसल्याने भटक्या श्वानांना असह्य उपासमार सहन करावी लागत आहे. ते पाहून काही युवकांनी त्यांच्यासाठी खाणे तयार करण्याचा संकल्प सोडला. अल्पावधीतच याला चांगले संघटित स्वरूप आले असून ही श्वानांची खानावळ आता सहकारनगरमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.

पुणे अँनिमल्स, सहकारनगर असा एक ग्रुपच यातून तयार झाला आहे. परिसरातील सर्व भटक्या, अनाथ प्राण्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था ते करतात. तांदळाची पेज व चिकनचे सूप हा मेन्यू ते दररोज सर्व श्वानांना देतात. त्यासाठीचा रोजचा २५०० रूपये खर्च एकमेकांच्या खिशातून स्वतः करतात.

सहकारनगर, तळजाईपासून वाळवेकरनगर, टिळकरस्त्यापर्यंत दररोज अंदाजे १५०० भटके श्वान आणि मांजरी यांच्या पोटाची भूक त्यातून भागते. अनिकेत सातव व अन्य २५ जण एकत्रितपणे हे काम गेले वर्षभर स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून करत आहेत.

अनाथ लहान पिल्ले, सोडून दिलेली जनावरे यांच्यासाठी त्यांनी दत्तक योजना सुरू

अपघातात सापडलेल्या तसेच आजारी प्राण्यांना वैद्यकीय मदत पुरवणे, बरे होईपर्यंत त्यांना सांभाळणे, त्यांची नसबंदी करणे ही कामेही आता ही मुले करतात. नुकतीच अनाथ लहान पिल्ले, सोडून दिलेली जनावरे यांच्यासाठी त्यांनी दत्तक योजना सुरू केली आहे. भूतदयेने भारावलेल्या या मुलांंना मदत करायची इच्छा असेल तर सहकारनगरमध्ये संपर्क साधा. रस्त्यावर कुठे ना कुठे या अँनिमल ग्रुपचा एक तरी सदस्य तूम्हाला नक्की दिसेल.

Web Title: Commendable activities of the youth of Pune! Meals for hungry dogs are provided daily at their own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.