आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या जागेत होणार व्यापारी संकुलाची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:20+5:302021-06-23T04:08:20+5:30
या व्यापारी संकुलामागे नफा कमवायचा उद्देश नाही. सर्वसामान्य माणूस सक्षमपणे उभा राहिला पाहिजे, यातून संस्थेला हातभार लागला पाहिजे. असा ...
या व्यापारी संकुलामागे नफा कमवायचा उद्देश नाही. सर्वसामान्य माणूस सक्षमपणे उभा राहिला पाहिजे, यातून संस्थेला हातभार लागला पाहिजे. असा या संकूल बांधण्यामागचा उद्देश आहे, असे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले.
साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश खाडे, नियामक मंडळाचे सदस्य खाजाभाई बागवान, रमेश कोतवाल, श्रीहरि कोतवाल, अजय काळे, बांदल, रामचंद्र खेडेकर, ॲड. कला फडतरे, बाळासाहेब मुळीक, ईश्वर कापरे, रमेश मुळीक, अनिल माने, तात्या मोरे आदी उपस्थित होते.
सचिव शांताराम पोमण यांनी स्वागत केले. बंडूकाका जगताप यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : २२ सासवड व्यपारी संकूल
फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथील आचार्य अत्रे व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करताना माजी आमदार अशोक टेकवडे शेजारी विजय कोलते.