कमिशन एजंटांचे धाबे दणाणले, मांजरी उपबाजारात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:31+5:302021-09-14T04:14:31+5:30

शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेला शेतमाल, मेहनत, खते, बी - बियाणे, औषधे व फवारण्या करणे एवढे कष्टाचे काम करूनही शेतमालाचे ...

Commission agents raided, action in the cat sub-market | कमिशन एजंटांचे धाबे दणाणले, मांजरी उपबाजारात कारवाई

कमिशन एजंटांचे धाबे दणाणले, मांजरी उपबाजारात कारवाई

Next

शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेला शेतमाल, मेहनत, खते, बी - बियाणे, औषधे व फवारण्या करणे एवढे कष्टाचे काम करूनही शेतमालाचे टाकणीपासून कापणीपर्यंत देखभाल करूनही जेवढे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्याच्या कितीतरी पटीने अधिक उत्पन्न हे दुबार विक्री करणारे मिळवत होते. उपबाजाराची वेळ दुपारी दोनची आहे. हे दुबार विक्री करणारे व्यापारी बारा ते दोन वाजण्याच्या आसपास माल खरेदी करून ठेवून नंतर दुपारी दोन नंतर त्याची विक्री करून भरघोस नफा कमवतात. आणी रोजच ते विक्री करण्यासाठी हजर असल्याने खरेदीसाठी येणारे व्यापारीही प्रथमतः त्यांचाच माल खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होणे कठीण होऊन बसले होते. कोथिंबीर आणि मेथीचे गाळ्यात हे दुबार विक्री करणारे व्यापारी जास्त प्रमाणात होते. हे व्यापारी स्थानिक परिसरातील व नात्यागोत्यातील असल्याने त्यांचे विरोधात कोणी तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. आज बाजार समितीच्या धडक कारवाईमुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले

याबाबत मांजरी विभागप्रमुख विजय घुले यांनी आवाहन केले की, शेतकऱ्यांनी स्वतःचा माल स्वत: विकावा. हा शेतकरी बाजार असल्याने येथून पुढे शेतमालाची दुबार विक्री होणार नाही. याबाबत शेतकऱ्यांनी बाजार समितीस सहकार्य करावे.

फोटो - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात कारवाई करताना विभागप्रमुख विजय घुले, त्यांचे अधिकारी व कर्मचारी.

Web Title: Commission agents raided, action in the cat sub-market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.