राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांचा जामीन फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 08:19 PM2023-08-29T20:19:20+5:302023-08-29T20:20:15+5:30

नोकरीच्या आमिषानेे फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Commissioner of the State Examination Council, Shailaja Darade, was denied bail | राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांचा जामीन फेटाळला 

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांचा जामीन फेटाळला 

googlenewsNext

पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिषाने ४४ जणांना तब्बल ५ कोटींची फसवणुक प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांचा जामीन अर्ज लष्कर न्यायालयाचे  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी फेटाळला.

नोकरीच्या आमिषानेे फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी शैलजा दराडे यांना अटक केली होती. दराडे यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दराडे यांनी याप्रकरणात जामीन मिळवण्यासाठी लष्कर न्यायालयात त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज दाखल केला. 

सरकारी वकिलांनी दराडे यांच्या जामिनास विरोध केला. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे. दराडे यांना जामीन मंजूर झाल्यास तपासास बाधा येईल. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती सरकारी वकिलांनी युक्तीवादात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन दराडे यांचा जामीन अर्ज फेटाळला.  

फिर्यादी सुर्यवंशी शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरी मिळवायची होती. त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत असताना जून २०१९ मध्ये सुर्यवंशी यांची भेट आरोपी दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानुसार मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगितले. आरोपी दादासाहेबने त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसरमध्ये २७ लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली. दराडे यांनी विविध शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ जणांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले होते. 

Web Title: Commissioner of the State Examination Council, Shailaja Darade, was denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.