कोराेना काळातील गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्तांचा पुणेकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:41+5:302021-01-19T04:14:41+5:30
पुणे : कोरोना काळात शहरात दाखल केेलेल्या गुन्ह्यात नागरिकांची भावना लक्षात घेऊन त्यांना त्रास होणार नाही, अशी कार्यवाही केली ...
पुणे : कोरोना काळात शहरात दाखल केेलेल्या गुन्ह्यात नागरिकांची भावना लक्षात घेऊन त्यांना त्रास होणार नाही, अशी कार्यवाही केली जाईल. जे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये कार्यवाही करावी लागणार आहे, पण त्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही, याची पोलीस काळजी घेतील, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
कोरोना काळात शहरात संचारबंदी मोडल्याबद्दल जवळपास २८ हजार पुणेकरांवर १८८ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या गुन्ह्यात पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहेत. त्यासाठी नागरिकांकडून आधार कार्ड व इतर कागदपत्रे घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात येत आहे, तसेच न्यायालयाचे समन्स घरी जाऊन बजावले जात आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांकडून रोष व्यक्त होऊ लागला आहे.
पुणेकरांची भावना लक्षात घेऊन त्यांना त्रास होणार नाही. अशी कार्यवाही केली जाईल, तसेच यापूर्वी जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर कार्यवाही करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.