‘स्मार्ट’साठी आयुक्तांची दिल्लीवारी

By admin | Published: September 22, 2015 03:29 AM2015-09-22T03:29:13+5:302015-09-22T03:29:13+5:30

स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या प्रस्तावाच्या गाईडलाइनसंदर्भात अधिक स्पष्टता यावी याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांनी नगरविकास मंत्रालयातील अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांची

Commissioner for Smart | ‘स्मार्ट’साठी आयुक्तांची दिल्लीवारी

‘स्मार्ट’साठी आयुक्तांची दिल्लीवारी

Next

पुणे : स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या प्रस्तावाच्या गाईडलाइनसंदर्भात अधिक स्पष्टता यावी याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांनी नगरविकास मंत्रालयातील अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांची दिल्लीला जाऊन सोमवारी भेट घेतली.
स्पर्धात्मक पातळीवर पहिल्या टप्प्यातील स्मार्ट शहरांची निवड होणार असल्याने केंद्राकडे सादर करावयाचा प्रस्ताव अधिक चांगला व्हावा याकरिता सर्वच महापालिकांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करण्याबाबत असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी कुणाल कुमार यांनी शर्मा यांची भेट घेतली. या वेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समन्वयक व उपायुक्त अनिल पवार उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या गाईडलाइन बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी प्रस्तावामध्ये नागरिकांच्या सहभागाला मोठे गुणांकन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून नागरिकांना कशी स्मार्ट सिटी हवी आहे यावर विशेष भर देण्यात येत आहे. नागरिकांनी केलेल्या सूचनांवर आधारितच स्मार्ट सिटी प्रस्ताव बनविला जाणार आहे. प्रस्तावाचा आराखडा तयार झाल्यानंतर तो पुन्हा नागरिकांपुढे सादर करून त्यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्याकडूनही सूचना जाणून घेतल्या.

Web Title: Commissioner for Smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.