परिवहन आयुक्तांनी घेतला ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:02+5:302021-08-13T04:16:02+5:30

पुणे: राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी भोसरी येथील सीआयआरटी (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट) ह्या संस्थेला भेट ...

The Commissioner of Transport reviewed the driving test track | परिवहन आयुक्तांनी घेतला ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचा आढावा

परिवहन आयुक्तांनी घेतला ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचा आढावा

Next

पुणे: राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी भोसरी येथील सीआयआरटी (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट) ह्या संस्थेला भेट देऊन राज्यात होणाऱ्या ऑटोमोटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक व सर्टिफिकेशन सेंटरच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी राज्यातील १३ प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.

परिवहन विभागाने राज्यांत २२ आरटीओ कार्यालयात टेस्ट ट्रॅकला मंजुरी दिली आहे. मात्र त्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्याविषयी आढावा घेतला. तसेच सर्टिफिकेशन सेंटरच्या कामाची माहिती ढाकणे यांनी घेतली. ब्रेक टेस्टिंगचे काम अद्ययावत होणार आहे. पुणे आरटीओ कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोलापूर, अकलूज, बारामती, पिपरी चिंचवडसह अन्य ठिकाणी टेस्टिंग ट्रॅक केले जाणार आहेत. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी संजय ससाणे यांच्यासह सीआयआरटीचे प्राचार्य डॉ. सोनेर पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The Commissioner of Transport reviewed the driving test track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.