आयुक्तांची पालकांना मनाई; कार्यालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 03:00 AM2018-09-18T03:00:10+5:302018-09-18T03:00:23+5:30
शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पालकांना भेट देण्यास मनाई केल्याने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला
पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पालकांना भेट देण्यास मनाई केल्याने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला.
शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी पुण्यात पालकांची मीटिंग घेतली असता प्राजक्ता पेठकर एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा प्राजक्ता पेठकर यांच्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली होती. त्यामुळे त्यानंतर यापुढे प्राजक्ता पेठकर यांना कोणीही अधिकाऱ्यांनी भेटू नये, असे निर्देश कृष्णा यांनी दिले आहेत. सोमवारी पेठकर या सोळंकी यांना भेटण्यास गेल्या असता त्यांना भेट नाकारण्यात आली. त्यावरून मोठा गोंधळ उडाला.
जनतेच्या प्रश्नांसंदर्भात अधिकाºयांची भेट घेणे हा आमचा घटनादत्त अधिकार असून तो हिरावून घेता येणार नाही, अशी भूमिका पालकांकडून घेण्यात आली. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. या वेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले; त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्राजक्ता पेठकर यांनी केला आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले, की शैक्षणिक बाबींमध्ये प्राजक्ता पेठकर यांना अधिकाºयांकडून नेहमी सहकार्य करण्यात आले आहे; मात्र त्यांनी सचिव वंदना कृष्णा यांच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण केले. त्यामुळे त्यांनी सचिवांची माफी मागितल्याशिवाय त्यांना आमचा कोणताही अधिकारी भेटणार नाही.’’
अधिकाºयांना भेटणे हा पालकांचा अधिकार आहे, त्यांनी गैरवर्तणूक केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो; मात्र भेट नाकारता येणार नाही. हा त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा भंग असल्याने त्याविरोधात अधिकाºयांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे प्राजक्ता पेठकर यांनी सांगितले. वंदना कृष्णा यांना भेटले असता त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पेठकर यांनी केला आहे.
अधिकाºयांना भेटणे हा पालकांचा अधिकार आहे. त्यांनी गैरवर्तणूक केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो; मात्र भेट नाकारता येणार नाही. हा त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा भंग असल्याने त्याविरोधात अधिकाºयांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे.
- प्राजक्ता पेठकर, अध्यक्षा प्राजक्ता पेठकर एज्युकेशन ट्रस्ट
प्राजक्ता पेठकर यांना अधिकाºयांनी नेहमी सहकार्य केले आहे. मात्र, त्यांनी सचिव वंदना कृष्णा यांच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण केले. सचिवांची माफी मागितल्याशिवाय त्यांना आमचा कोणताही अधिकारी भेटणार नाही.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त