महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध : मीनाताई कांबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:21+5:302021-02-07T04:10:21+5:30

महिला कौशल्य विकास व उद्योग सखी यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन अनुकूल झाले असून त्याकरिता नेहमीच ...

Committed to the development of women: Meenatai Kambli | महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध : मीनाताई कांबळी

महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध : मीनाताई कांबळी

googlenewsNext

महिला कौशल्य विकास व उद्योग सखी यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन अनुकूल झाले असून त्याकरिता नेहमीच प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले .

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे पिरंगुट ता. मुळशी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिलांकरिता सर्व क्षेत्रात मोठ्या संधी असून महिलांनी स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल केली पाहिजे.

यावर्षी आरोग्य शिबिर यामध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी, अस्थीरोग व दंतचिकित्सा, बचत गटांच्या विविध वस्तू विक्रीचे प्रदर्शन व विक्री, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी पाककला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, खेळ पैठणीचा हा महिलांचा विशेष आवडीचा कार्यक्रम, महिलांसाठी हळदी-कुंकू, शिलाई मशीन वाटप असा दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासोबतच आशा - अंगणवाडी, कार्यकर्त्या, पत्रकार , ग्रामपंचायत कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी पत्रकार , प्रशासन यांचा कोरोना योध्दे म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .

प्रास्ताविक कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक संगीता पवळे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटिका संगीता पवळे व पिरंगुटच्या माजी सरपंच सुरेखा संभाजी पवळे यांनी पुढाकार घेतला .

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे , बारामती लोकसभा सहसंपर्क संघटिका किर्ती फाटक, संपर्क संघटिका तृष्णा विश्वासराव,दिव्या बडवे, लतिका पाष्ठे,रंजनाताई नेवाळकर, माजी सभापती बाळासाहेब पवळे , मा. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय टेमघरे , ज्येष्ठ नेते बबनराव दगडे , संगीता पवळे , भोर विधानसभा प्रमुख प्रकाश भेगडे , जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर , तालुका प्रमुख संतोष मोहोळ , तालुका संघटिका ज्योतीताई चांदेरे ,पिरंगुट माजी सरपंच बाळासाहेब गोळे , भानुदास पानसरे , सरपंच चांगदेव पवळे , तसेच भोर व खडकवासला विधानसभा मतदार संघातील महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते. ज्ञानेश्वर पवळे यांनी आभार मानले.

पिरंगुट येथे पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गरजू महिलाना शिलाई मशीनचे वाटप करताना मान्यवर.

Web Title: Committed to the development of women: Meenatai Kambli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.