गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:33 AM2021-01-08T04:33:55+5:302021-01-08T04:33:55+5:30

पुणे : आंबेगाव तालुक्यातील फलोदे येथील एका गर्भवती महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने २६ डिसेंबरला मृत्यू झाला होता. याचे ...

A committee of four senior officials has been constituted in connection with the death of a pregnant woman | गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत

Next

पुणे : आंबेगाव तालुक्यातील फलोदे येथील एका गर्भवती महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने २६ डिसेंबरला मृत्यू झाला होता. याचे वृत्त लोकमतने दिले होते. या घटनेची गभीरपणे दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शल्यचिकिस्तकांच्या अध्यक्षतेखाली तिन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदीवासी भागातील फलोदे येथे २६ डीसेंबरला पुनम दत्तात्रय लव्हाळे यांना प्रसुतीसाठी तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे रूग्णवाहिका नसल्याने त्यांना खाजगी रूग्णवाहिकेने घोडेगाव जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, डॉक्टर नसल्याने त्यांना तेथे उपचार न मिळाल्याने मंचर उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, काेरोना रूग्णांमुळे तेथील डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने त्यांना पुण्यातील वायसीएम रूग्णालयात नेण्याचे नातेवाईकांनी ठरवले. मात्र, त्यांना दोन तास रूग्णवाहिका मिळाली नाही. दोन तासानंतर रूग्णवाहिका मिळाल्याने लव्हाळे यांना पिपंरी चिंचवड मध्ये आणण्यास उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याची दखल घेत चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती घठीत केली. जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली असुन यात जिल्हा कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय मुंडे, प्रकल्प अधिकारी आर. बी. डुंबरे, वैद्यकीय अधिकारी अमितकुमार पाटील यांचा समावेश आहे. समितीला सखोल तपासणी करून १५ जानेवारीच्या आत अहवाल सादर करण्याच्या आदेश दिले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव ग्रामीण रूग्णालय, मंचर येथील उपजिल्हा रूग्णालय असतांनाही तेथे उपचार न मिळाल्याने गर्भवतीला वायसीएम रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वी तीचा मृत्यू झाला होता.

Web Title: A committee of four senior officials has been constituted in connection with the death of a pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.