पंधरा देशातून सामुदायिक ऑनलाईन ‘घोरात्कष्टात स्तोत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:16+5:302020-12-24T04:11:16+5:30

पुणे : ऑलनाईन पद्धतीने सामाजिक भान राखत यंदा १५ देशांतून एकत्रितपणे शेकडो दत्तभक्त सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या ...

Community Online 'Ghoratkashtat Stotra' from 15 countries | पंधरा देशातून सामुदायिक ऑनलाईन ‘घोरात्कष्टात स्तोत्र’

पंधरा देशातून सामुदायिक ऑनलाईन ‘घोरात्कष्टात स्तोत्र’

Next

पुणे : ऑलनाईन पद्धतीने सामाजिक भान राखत यंदा १५ देशांतून एकत्रितपणे शेकडो दत्तभक्त सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुहिक पठण करणार आहेत. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि नाना महाराज तराणेकर, इंदोर प्रणित अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरात २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे. ग्लोबल स्ट्रिमिंग सिस्टीमद्वारे एकाचवेळी देशांतर्गत तसेच परदेशातही होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी दिली. दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उत्सव उपप्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त अंकुश काकडे, अ‍ॅड.एन.डी.पाटील, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई आदींनी उत्सवाचे नियोजन केले आहे.

Web Title: Community Online 'Ghoratkashtat Stotra' from 15 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.