रेमडेसिविरसाठी कंपन्या प्रतिसाद देईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:36+5:302021-04-18T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे : जिल्हा प्रशासनासह राजकीय पातळीवर देखील पुण्यासाठी दररोज किमान रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे : जिल्हा प्रशासनासह राजकीय पातळीवर देखील पुण्यासाठी दररोज किमान रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू असताना देखील शनिवार (दि.17) पुणे जिल्ह्यासाठी केवळ 1 हजार 300 इंजेक्शन उपलब्ध झाले. जिल्हाधिकारी व सर्वच प्रशासकीय यंत्रणा अनेक औषध निर्मिती कंपन्यांशी चर्चा करत आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यावरून देशपातळीवर राजकारणाचा अनुभव पुण्याला आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत औषध निर्मिती करणा-या सिप्ला, मेट्रो या कंपन्यांशी सतत संपर्क करून देखील रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्राला साठा द्या अथवा देऊ नका, पण पुण्यात तुमचे प्लॅन्ट असताना तुम्ही पुण्याला असे औषध पुरवठा करण्यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे देखील प्रशासनाकडून सुनावण्यात आले. त्यानंतर सिप्ला कंपनीकडून 1 हजार 300 रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली.