पार्सलचा बॉक्‍स गहाळ केल्याप्रकरणी कंपनीला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:41+5:302021-01-20T04:11:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पार्सलद्वारे पाठविण्यात आलेले ग्राहकाचे साहित्य गहाळ केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित ...

Company fined for missing parcel box | पार्सलचा बॉक्‍स गहाळ केल्याप्रकरणी कंपनीला दंड

पार्सलचा बॉक्‍स गहाळ केल्याप्रकरणी कंपनीला दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: पार्सलद्वारे पाठविण्यात आलेले ग्राहकाचे साहित्य गहाळ केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित पॅकर्स व मूव्हर्स कंपनीला गहाळ झालेल्या वस्तूंचे १६ हजार रुपये दीड महिन्याच्या आत तक्रारदाराला द्यावेत. तक्रारीच्या खर्चापोटी दोन हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला आहे.

आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी हा आदेश दिला. याबाबत मोपेद्रकुमार यांनी सोबीर सिंग, पॅकर्स व मूव्हर्स विरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मुंढवा येथून त्यांचे साहित्य छत्तीसगड येथील धामात्री येथे पाठवायचे होते. त्यासाठी आठ हजार रुपये देण्याचे ठरले. पॅकर्स कंपनीने तक्रारदार यांचे साहित्य नऊ बॉक्‍समध्ये पॅक करून १७ ऑगस्ट २०१९ रोजी पुण्याहून पाठवून दिले.

ते थेट एका महिन्यानंतर पोचले. त्यावेळी त्यात दोन बॉक्‍स कमी होते. याबाबत तक्रारदाराने कंपनीला कॉल केला असता तुमचे बॉक्‍स नागपूर येथील ग्राहकाकडे गेले आहेत. लवकरच ते परत पाठवू, असे त्यांना सांगितले. बॉक्‍स परत देऊ शकलो नाही तर पैसे देऊ, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र बॉक्‍स न मिळाल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत आयोगाने वरील आदेश दिले.

Web Title: Company fined for missing parcel box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.