लॉकडाऊनमध्ये काम सुरू ठेवल्याने कंपनीला लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:25+5:302021-04-11T04:09:25+5:30
त्याबरोबरच पुन्हा असा प्रकार घडल्यास आस्थापनेला सील करण्यात येईल, अशी ताकीद दिली. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त ...
त्याबरोबरच पुन्हा असा प्रकार घडल्यास आस्थापनेला सील करण्यात येईल, अशी ताकीद दिली. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आशा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर भागात लॉकडाऊनच्या नियम विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. शुक्रवारी (ता.9) ला अधिकाऱ्यांनी वाकडेवाडीमध्ये कॅलिबर बिझनेस सपोर्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू असल्याची माहिती मिळली. अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता कंपनीमध्ये सुमारे ८७ कामगार काम करताना आढळले. काम करताना शारीरिक अंतरही पाळण्यात आले नव्हते. कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्कसुद्धा वापरलेला नव्हता.
महापालिकेने आखून दिलेल्या नियमानुसारच कंपन्यांनी काम सुरू करावे. अन्यथा कोविड प्रतिबंधासाठी अजून कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या सहायक आयुक्त आशा राऊत यांनी सांगितले आहे.
या कारवाई करताना महापालिका सहायक आयुक्त आशा राऊत, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आय. एस. इनामदार, सुनील कांबळे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजेश आडागळे उपस्थित होते.