वरिष्ठ सल्लागाराच्या कुटुंबीयांना ७१ लाख ५० हजार रुपयांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:38+5:302021-09-26T04:12:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका कंपनीच्या वरिष्ठ सल्लागाराच्या कुटुंबीयांना शनिवारी ...

Compensation of Rs. 71 lakh 50 thousand to the family of the senior consultant | वरिष्ठ सल्लागाराच्या कुटुंबीयांना ७१ लाख ५० हजार रुपयांची भरपाई

वरिष्ठ सल्लागाराच्या कुटुंबीयांना ७१ लाख ५० हजार रुपयांची भरपाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका कंपनीच्या वरिष्ठ सल्लागाराच्या कुटुंबीयांना शनिवारी झालेल्या लोकअदालतीत ७१ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.

संबंधित वरिष्ठ सल्लागारांचे वय साठ वर्षे होते. सेवानिवृत्तीनंतर ते रांजणगाव एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीत ‘ॲडव्हायजर टेक्निकल ट्रेनिंग सेल्स डिपार्टमेंट’ पदावर कार्यरत होते. त्यांना दरमहा एक लाख १० हजार रुपये पगार होता. ते २२ जून २०१८ रोजी दुपारी एकच्यासुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या रुग्णवाहिकेने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला.

मृत वरिष्ठ सल्लागाराची पत्नी, मुलगा, मुलगी व आईने ॲड. अनिल पटणी व ॲड. आशिष पटणी यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला. एसबीआय जनरल इन्श्युरन्स कंपनी व रुग्णवाहिका मालकाविरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. लोकअदालतीत तो निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आला. विमा कंपनीच्या वतीने ॲड. ऋषिकेश गानू यांनी काम पाहिले.

मृत व्यक्तीचे वय, त्यांचा पगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा विचार करून तडजोडीपोटी ७१ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी ॲड. पटनी यांनी लोकअदालतीत केली. विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. यासीन शहा, फाल्गुनी दत्ता, विक्रम कालिकोत व विधी अधिकारी संतोष मोरे यांनी ही भरपाई देण्याचे मान्य केले. त्यानंतर हा दावा निकाली काढण्यात आला

--------------------------------

Web Title: Compensation of Rs. 71 lakh 50 thousand to the family of the senior consultant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.