न्यायालयात टिकेल असे सक्षम विधेयक
By admin | Published: December 22, 2015 01:33 AM2015-12-22T01:33:55+5:302015-12-22T01:33:55+5:30
बैलगाडा बंदीविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल असे सक्षम विधेयक लवकरच पारित करून घेण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
पाईट : बैलगाडा बंदीविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल असे सक्षम विधेयक लवकरच पारित करून घेण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. लवकरात लवकर बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी मी व सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिष्टमंडळाला दिले.
बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे जावडेकर यांची भेट घेतली.
मागील सरकारने बैल या प्राण्याचा वन्य प्राण्यांत समावेश केला. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणे शक्य झाले होते. बैलगाड्यांचे समर्थक म्हणणाऱ्यांनीही विरोध केला नाही. त्याच वेळेस विरोध केला असता तर बैलगाडा शर्यती बंद झाल्या नसत्या. मात्र हेच लोक आता बैलगाडा शर्यती चालू झाल्या नाही तर आंदोलनाची भाषा बोलत आहते. परंतु आपले सरकार बैलगाडा शर्यती लवकरच
सुरू करेल, असे जावडेकर यांनी सांगितले.
वस्तुस्थितीची माहिती मांडण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तान्हाजी दिवेकर, माजी सभापती शरद बुट्टे-पाटील, राजगुरुनगरचे माजी सरप्ांच व भाजपानेते अतुल देशमुख, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रामदास मेदनकर, बैलगाडामालक दत्तात्रय रौंधळ, मुकुंद बोराडे, दत्तात्रय सातकर आदी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)