स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आजारांच्या विळख्यात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 02:54 AM2018-08-13T02:54:54+5:302018-08-13T02:55:07+5:30

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे.

Competition examinations show students' illnesses | स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आजारांच्या विळख्यात, दोघांचा मृत्यू

स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आजारांच्या विळख्यात, दोघांचा मृत्यू

Next

पुणे - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्याचबरोबर वेळेवर परीक्षा न होणे, परीक्षांमध्ये येणारे अपयश यातून नैराश्यासंबंधी विविध आजारांचाही सामना करावा लागत आहे. या दुर्लक्षामुळेच पोटाच्या तसेच आतड्यांच्या आजाराने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उजेडात आली आहे.
पुणे शहरामध्ये साधरणत: दीड ते दोन लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. दरवर्षी राज्याच्या कानाकोपºयातून पुण्यात अभ्यासाला येणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शक्यतो पदवीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागतात. गेल्या काही दिवसांत या विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाकडून काढल्या जाणाºया दरवर्षी काढल्या जाणाºया जागांमध्ये मोठी घट झाली आहे. त्याचवेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
परिणामी, रात्रभर जागून अभ्यास करणे, रात्री झोप येऊ नये म्हणून सतत चहा पिणे, ताणतणाव यामुळे त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. पोटाचे आजार, मूळव्याध, मान व खांदेदुखी, डिप्रेशन अशा विविध आजारांना बहुसंख्य विद्यार्थी सामोरे जात आहेत. त्याचबरोबर आरोग्याकडे केलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे पोटाचे गंभीर आजार होऊन दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग करणाºया एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. विशेषत: मुलींकडून आरोग्याची जास्त हेळसांड होत असल्याची माहिती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी दिली.
सातत्याने मसालेदार पदार्थ, फास्ट फूड खाणे, पाणी कमी
पिणे, मेसमधील अन्नपदार्थांचा
निकृष्ट दर्जा, ५ रुपयांत वडापाव, १० रुपयांत मसाला डोसा
अशा स्वस्तातील व निकृष्ट पदार्थांना ते बळी पडत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
एकीकडे परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा जाहीर झाली तरी जागांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यातून अनेक वर्षे अभ्यास
करूनही यश न येणे, वाढते वय, घराकडच्या अडचणी या साºयांमुळे नैराश्य, मानसिक ताणतणाव याला त्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.

महापालिकेच्या दवाखान्यात उपचार

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत असला तरी पैशांच्या अडचणींमुळे ते डॉक्टरांकडे जाण्यास ते अनेकदा टाळाटाळ करतात. मराठवाडा, विदर्भ व इतर काही भागातून आलेले अनेक विद्यार्थी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

ईर्षेला बळी पडू नका
विद्यार्थी आपले करिअर घडविण्याच्या स्पर्धेत आरोग्याची अक्षम्य हेळसांड करीत आहेत. आपल्या बरोबरचा मित्र १० तास अभ्यास करतो, तर आपण त्याच्यापेक्षा जास्त वेळ अभ्यासाला बसायचेच अशा ईर्षेलाही ते बळी पडत आहेत. बहुसंख्य विद्यार्थी व्यायामही करीत नाहीत. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आरोग्य जपणे आवश्यक आहे.
- महेश बढे, प्रतिनिधी, एमपीएससी राइट

आयडियल टाइम टेबलचा
अवलंब करावा
अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या आजारपणाविषयीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. हे टाळण्यासाठी त्यांनी आयडियल टाइम टेबलचा अवलंब करावा. यामध्ये रात्री ११ ते ५ या वेळेत झोप घेतलीच पाहिजे. रात्री अभ्यास करण्याऐवजी पहाटे उठून अभ्यास केल्यास
त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. जास्त तिखट खाणे वा इतर कोणत्याही कारणापेक्षा रात्रीच्या जागरणामुळे अ‍ॅसिडिटी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जागरण करणे टाळावे. त्याचबरोबर वेळेवर जेवण करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्टॉलवरचे चायनिज पदार्थ तसेच आॅनलाइन वेबसाइटवरून आॅर्डर करून मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्याचेही परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. अनेकदा अभ्यास करताना बाक काढून बसणे, जास्तीत जास्त वेळ त्याच अवस्थेत राहण्याने त्यांना पाठ व मानदुखीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अभ्यास करण्याची पद्धत योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ. हेमंत अडसूळ,
जनरल फिजिशिअन
 

Web Title: Competition examinations show students' illnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.