तक्रार करणारे चोरटेचं अडकले जाळ्यात; अपघाताचा बनाव करून दारू लुटण्याचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 01:36 PM2021-11-01T13:36:53+5:302021-11-01T13:36:59+5:30

दोन दिवसांपूर्वी उंडवडी कडेपठार येथे दारूचे बॉक्स वाहतूक करणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता

Complainant thief caught an attempt to rob alcohol by pretending to have an accident failed | तक्रार करणारे चोरटेचं अडकले जाळ्यात; अपघाताचा बनाव करून दारू लुटण्याचा प्रयत्न फसला

तक्रार करणारे चोरटेचं अडकले जाळ्यात; अपघाताचा बनाव करून दारू लुटण्याचा प्रयत्न फसला

Next

उंडवडी कडेपठार : अपघाताचा बनाव करून ४० लाखाची दारू चोरणाऱ्या ट्रक चालक व ट्रकच्या मालकाला बारामती तालुका पोलिसांनी अलगद जाळ्यात पडकले आहे. दोन दिवसांपूर्वी उंडवडी कडेपठार येथे दारूचे बॉक्स वाहतूक करणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता फिर्यादी हाच चोरटा निघाल्याने बारामती परिसरात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक अंकुश बेंद्रे (रा.बारामती, ता.बारामती ) व मालक अजिनाथ जराड (रा.बारामती) दोघांविरोधात अपघाताचा बनाव करत अपहार केल्याचा गुन्हा तालुका पोलिसांनी दाखल केला आला आहे. मागील  दोन दिवसांपूर्वी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाया मॅकडॉल कंपनीमधून दारुचे बॉक्सचा ६५ लाख ८७ हजारांचा माल घेऊन निघाला होता. उंडवडी कडेपठार या ठिकाणी हा ट्रक पलटी झाला. मात्र चालक आणि ट्रकच्या मालकाने अपघाताचा बनाव केला होता. नंदकुमार क्षिरसागर (रा. गोतोंडी,ता.इंदापुर,जि.पुणे) याच्या मदतीने ट्रकमधील दारुचे ५०० बॉक्स असा ४० लाखांचा माल एका गोडाऊन मध्ये चालक बेंद्रे आणि मालक जराड यांनी लपवला होता.

चालकाला विचारलेल्या प्रश्नांवरून संशय निर्माण झाला

दोन दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील उंडवडी येथे दारू वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले होते. उंडवडी येथे घडलेल्या अपघाताची माहिती घेतली असता, चालकाला विचारलेल्या प्रश्नांवरून संशय निर्माण झाला होता. गुन्हे शोध पथकाने ट्रक कंपनी मधून निघाल्यापासून रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये ट्रक हा पहिल्यांदा भवानीनगर या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. त्यावरून गुन्हे शोध पथकाने कसून चौकशी केली असता, फियार्दींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अपघाताचा बनाव करत असल्याचा संशय पोलिसांना आला.

ट्रकचा अपघात झाल्याचे भासवले 

 फिर्यादीचा मित्र नंदकुमार क्षीरसागर (रा.गोतोंडी,ता.इंदापूर,जि.पुणे) याच्या गोडाऊन मध्ये तब्बल ५०० दारूचे बॉक्स असा ४० लाखांचा माल ठेवण्यात आला होता.  उंडवडी मधून जात असताना ट्रॅकला अपघात झाला असे भासवण्याकरीता ट्रॅक पलटी करून गावातील लोकांनी दारू लुटून नेली, अशी फिर्याद बारामती तालुका पोलिस ठाण्यात  दिली होती. गुन्हे शोध पथकाने सखोल तपास करत अपहार केलेला ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

दारूने भरलेला ट्रक झाला पलटी; नागरिकांनी पळवले दारूचे बॉक्स 

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खरात,गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे,नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोंखंडे, सदाशिव बंडगर अनिकेत शेळके यांनी केली आहे.

Web Title: Complainant thief caught an attempt to rob alcohol by pretending to have an accident failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.