Nirma Ad : निरमाच्या जाहिरातीवरुन वाद ; अक्षय कुमारच्या विराेधात पुण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:14 PM2020-01-08T16:14:14+5:302020-01-08T16:43:34+5:30

Nirma Ad : निरमाच्या जाहीरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची बदनामी झाली असल्याचा आराेप करत संभाजी ब्रिगेडकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

complaint against akshay kumar for defaming maratha idols | Nirma Ad : निरमाच्या जाहिरातीवरुन वाद ; अक्षय कुमारच्या विराेधात पुण्यात तक्रार दाखल

Nirma Ad : निरमाच्या जाहिरातीवरुन वाद ; अक्षय कुमारच्या विराेधात पुण्यात तक्रार दाखल

Next

पुणे : अक्षर कुमार मावळ्यांचे कपडे घालून शिंदेशाही पगडीसाेबत निरमाची जाहीरात करत आहे. या जाहीरातीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा अपमान हाेत आहे, असा आराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. या विराेधात आता पुण्यातील शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

अक्षय कुमारने निरमा वाॅशिंग पावडरची जाहीरात केली आहे. या जाहीरातीमध्ये अक्षय कुमारने मावळ्यांचे कपडे परिधान केले आहेत. तसेच मावळे लढाई करून आल्यानंतर त्यांच्या घरातील महिला (राणी) त्यांना हिणवून बोलतात, असे या जाहिराती मध्ये दाखवले आहे, असा आराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. ही जाहीरात तात्काळ बंद करावी तसेच 'निरमा' वॉशिंग पावडर चे मालक व कंपनी आणि आयुष लिमिटेड ही जाहिरात कंपनी यांच्यावर 'राष्ट्रपुरुष' यांची बदनामी केल्याप्रकरणी, मावळ्यांची बदनामी केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. 

''मावळे लढाई करून आल्यानंतर फक्त कपडे स्वच्छ करत बसायचे असा त्या जाहीरातीमगील संदेश आहे. कपडे धुण्यापुरते वा निरमा विकण्यापुरते 'मावळे' व त्यांचे कर्तृत्व उरले का, हा प्रश्न आहे. चित्रपट, कथा, कादंबऱ्या, पुस्तक व जाहिरात माध्यम यांना छत्रपती शिवाजी महाराज हे सॉफ्ट टार्गेट वाटतात. सतत बदनामी, अवहेलना किंवा चुकीची माहिती देणे हाच सर्रास धंदा सुरू आहे. सर्व प्रथम चुकीचा इतिहास मांडून प्रचंड बदनामी केली, परवा महाराजांना फेकून मारले, आज मावळ्यांनी कपडे धुतले. ह्या जाणिवपुर्वक वादग्रस्त चुकीच्या ठिणग्या टाकतय कोण ? अन्यथा 'एक दिवस गव्हा सोबत एक दिवस किडे'ही रगडले जातील.' सर्वप्रथम टीव्हीवर प्रसारित होणारी ही जाहिरात तात्काळ थांबवली गेली पाहिजे.'' असे संभाजी ब्रिगेडकडून आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे. 

Web Title: complaint against akshay kumar for defaming maratha idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.