गोपनीयता भंगप्रकरणी आयोगाकडे तक्रार

By admin | Published: October 25, 2016 06:27 AM2016-10-25T06:27:50+5:302016-10-25T06:27:50+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा सात आॅक्टोबरपूर्वीच फुटला. याची चौकशी करून गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी

Complaint to the Commission for breach of confidentiality | गोपनीयता भंगप्रकरणी आयोगाकडे तक्रार

गोपनीयता भंगप्रकरणी आयोगाकडे तक्रार

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा सात आॅक्टोबरपूर्वीच फुटला. याची चौकशी करून गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आणि प्रभागरचना सात आॅक्टोबरला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जाहीर करण्यात आली. या वेळी आयुक्त आणि निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
ही आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी महिनाभर अगोदरपासूनच प्रभागरचना फुटल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी केला होता. प्रभागरचनेचे काम गोपनीय आणि पारदर्शक पद्धतीने झाले आहे. प्रभागरचना फुटल्याच्या बातम्या कपोलकल्पित आहेत. प्रसारित झालेली माहिती आणि आमच्याकडील माहिती यात साम्य आढळल्यास ही चूक निदर्शनास आणून दिल्यास आम्ही चौकशी करू, असे आश्वासन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले होते.
प्रभागरचनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनीही एकमेकांवर आरोप केले होते. आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी गोपनीयतेचा भग केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint to the Commission for breach of confidentiality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.