लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार; तरुणीचे अश्लील व्हिडिओ आईला पाठवले, जीवे मारण्याचीही धमकी

By भाग्यश्री गिलडा | Published: August 11, 2023 11:43 AM2023-08-11T11:43:51+5:302023-08-11T11:44:14+5:30

आरोपीने तरुणीच्या आईला मेसेज करून "मी तुझ्या मुलीला व मुलाला जीवे मारून टाकेन" अशी धमकी दिली

Complaint of sexual assault to the police Young girl sent obscene videos to mother, even threatened to kill her | लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार; तरुणीचे अश्लील व्हिडिओ आईला पाठवले, जीवे मारण्याचीही धमकी

लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार; तरुणीचे अश्लील व्हिडिओ आईला पाठवले, जीवे मारण्याचीही धमकी

googlenewsNext

पुणे: लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने अल्पवयीन तरुणीचे नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडिओ क्लिप तरुणीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हाट्सअप द्वारे पाठवले. इतकंच नव्हे तर आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकीही दिल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. 

पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात मैत्री संबंध होते. आरोपीने एप्रिल महिन्यात आपला वाढदिवस असल्याचे सांगून फिर्यादीला लॉजवर घेऊन जात जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. याप्रकरणी फिर्यादीने लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून आरोपीने ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी तरुणी ही रस्त्याने जात असताना तिचा पाठलाग केला. तिच्या आई आणि नातेवाईकांच्या व्हाट्सअप वर फिर्यादीचे नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडिओ पाठवले. आरोपीने फिर्यादीच्या आईला मेसेज करून "मी तुझ्या मुलीला व मुलाला जीवे मारून टाकेन" अशी धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात कलम ३५४ (ड), कलम ५०६ सह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडसे अधिक तपास करत आहे.

 

Web Title: Complaint of sexual assault to the police Young girl sent obscene videos to mother, even threatened to kill her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.