चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:31 PM2018-05-16T14:31:56+5:302018-05-16T14:36:19+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा पतीसह सासरच्यांकडून छळ सुरु होता.

complaint registred against five people In case of maritial harasshment | चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

Next

चाकण : चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद व दीर यापाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मे २०१७ ते १२ डिसेंबर २०१७ दरम्यान खराबवाडी ( ता.खेड ) येथील पवार वस्तीवर घडली. प्रगती रवी भालेराव (वय २१, रा. खराबवाडी, चाकण, मुळगाव कोरनुळ जि. लातूर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती रवी निवृत्ती भालेराव, सासरे निवृत्ती गंगाराम भालेराव, सासू कमल निवृत्ती भालेराव, दीर राहुल निवृत्ती भालेरावव नणंद सुकेशनी सटवाजी काळे या पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक,शारीरिक छळ करत होते.विवाहितेने काही दिवस हा त्रास सहन केला. परंतु, त्रास वाढल्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची शहानिशा करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: complaint registred against five people In case of maritial harasshment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.