ग्रामपंचायत सदस्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:09+5:302021-01-15T04:10:09+5:30

सदस्य गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, ग्रामपंचायत वाघळवाडी येथे राज्याचे ...

Complaint of threatening to kill a Gram Panchayat member | ग्रामपंचायत सदस्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

ग्रामपंचायत सदस्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

Next

सदस्य गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, ग्रामपंचायत वाघळवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १५० झाडांचे वृक्षारोपण जुलै २०१९ मध्ये करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतचे गायरान गट क्रमांक ४९ मध्ये असलेल्या जागेत वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पडला होता. यानंतर गेली दीड वर्ष ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठिबक व पाईप लाईन करून दररोज झाडांची काळजी घेत झाडे वाढविण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतच्या वतीने प्रतिनिधी या नात्याने हेमंत गायकवाड लक्ष देऊन झाडे जगवत आहेत. परंतु अनंत सकुंडे यांनी या झाडे लावलेल्या ठिकाणी गायरान जागेत ग्रामपंचायतच्या कामात अडथळा करून शासकीय जागेत पाच एकर जागेला तारेचे कम्पाउंड केले आहे. लगतच वन क्षेत्र आहे.

या ठिकाणी हरीण व अन्य पाणी वास्तव्य करतात. त्यांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. दि. ११ जानेवारी २०२१ रोजी दुपारी सकुंडे त्याच्या साथीदारांनी ग्रामपंचायतने खर्च करून लावलेल्या आणि १५ ते २० फूट वाढ झालेल्या जवळपास २० झाडांची तोड करून शासकीय कामाचे नुकसान केले. झाडे तोडू नका असे त्यांना त्या घटनास्थळी जाऊन अडवले असता या ठिकाणी पाऊल ठेवायचे नाही, ही जागा आमच्या मालकीची आहे. तारेच्या कम्पाउंडच्या आतमध्ये आल्यास हातपाय तोडण्यात येईल. या ठिकाणी कोणीच फिरकायचे नाही, मी वकील आहे. मला कोणाची भीती नाही, असे म्हणत गायकवाड यांना समक्ष जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Complaint of threatening to kill a Gram Panchayat member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.