वालचंदनगरच्या ‘त्या’ विकृत उपशिक्षकाविरुद्ध बालसमितीकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:22 PM2022-11-01T19:22:06+5:302022-11-01T19:22:27+5:30

या प्रकरणाची दखल घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप अर्जात केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे...

Complaint to the Children's Committee against 'that' deformed sub-teacher of Walchandnagar | वालचंदनगरच्या ‘त्या’ विकृत उपशिक्षकाविरुद्ध बालसमितीकडे तक्रार

वालचंदनगरच्या ‘त्या’ विकृत उपशिक्षकाविरुद्ध बालसमितीकडे तक्रार

Next

इंदापूर (पुणे) : विद्यार्थिनींना बॅड टच केल्याच्या आरोपावरून अटक असणाऱ्या वालचंदनगरच्या नामांकित विद्यालयातील विकृत उपशिक्षकाविरुद्ध त्या प्रकरणातील एका पीडितेने आपल्या मावशीकरवी मंगळवारी (दि.१) पुण्याच्या बालकल्याण समितीकडे लेखी तक्रार दिली आहे. यातील फिर्यादी असणाऱ्या प्राचार्यांनी व त्यांच्या महिला सहकाऱ्याने आपणास धमकावत, या प्रकरणाची दखल घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप अर्जात केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

वालचंदनगर येथील जुन्या व प्रतिष्ठित विद्यालयातील इंग्रजी विषयाच्या मध्यमवयीन उपशिक्षकाने दि.१३ जून पासून ४ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत इयत्ता सहावीच्या दोन तुकड्यांमधील ११ विद्यार्थिनींना बॅड टच करीत त्यांचे लैंगिक शोषण केल्याची विद्यार्थिनींची तक्रार होती. दि.४ ऑक्टोबर रोजी या विद्यार्थिनींनी आपल्या वर्गशिक्षिकांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर वर्गशिक्षिकांनी प्राचार्यांना त्याबद्दल कल्पना दिली. प्राचार्यांनी उपमुख्याधापकांशी विचारविनिमय करून त्या तुकड्यांच्या वर्गशिक्षिका व इतर दोन शिक्षिकांची चौकशी समिती स्थापन केली. घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिली. तो अहवाल त्याच दिवशी सादर झाला.

संबंधित उपशिक्षकास तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून प्राचार्यांनी त्याला खुलासा मागितला. दि.६ ऑक्टोबर रोजी त्या उपशिक्षकाने स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला. दि.१३ ऑक्टोबर रोजी आपला खुलासा दिला. तब्बल नऊ दिवसांच्या विलंबानंतर दि.२२ ऑक्टोबरला प्राचार्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बाललैंगिक अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ अन्वये गुन्हा दाखल झाला. आठवड्यानंतर २९ ऑक्टोबरला ‘त्या’ उपशिक्षकास अटक झाली. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. आरोपी सध्या इंदापूरच्या कारागृहात आहे. वालचंदनगरचे फौजदार अतुल खंदारे अधिक तपास करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका पीडितेने आपल्या मावशीकरवी पुण्याच्या बालकल्याण समितीकडे दिलेल्या लेखी तक्रारीत, तो उपशिक्षक तिच्यासह इतर मुलींबरोबर गैरवर्तन करीत होता. तक्रार केल्यास नापास करण्याची, शाळा बंद होईल अशी धमकी देत होता, असा दावा केला आहे. आरोपी दिसला तरी खूप भीती वाटते असे या अर्जात म्हटले आहे.

दि.४ ऑक्टोबर रोजी ही बाब प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनीही सगळ्यांना नापास करतो, दाखल्यावर लाल शेरा देतो, अशी दमदाटी केल्याचा आरोप त्या मुलीने केला आहे. प्राचार्य व त्यांच्या सहकारी महिला शिक्षिकेने ४ ऑक्टोबरपासून फिर्याद दाखल करण्याच्या मधल्या कालावधीत मुलींवर जाणीवपूर्वक दबाव टाकल्याचा दावाही या अर्जात करण्यात आला आहे.

Web Title: Complaint to the Children's Committee against 'that' deformed sub-teacher of Walchandnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.