आरटीई प्रवेशाबाबतच्या तक्रारींची सुनावणी संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:19+5:302021-07-27T04:12:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरटीई अंतर्गत गरीब विद्याद्यार्थ्यांना शिक्षण हक्क्कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेत शेवटच्या टप्यात गोंधळाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरटीई अंतर्गत गरीब विद्याद्यार्थ्यांना शिक्षण हक्क्कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेत शेवटच्या टप्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ४०० पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत अपील केले असून जिल्हा परिषेेच्या शिक्षण विभागामार्फत त्याचा निकाल वेळेत लागत नसल्याची तक्रार पालक करत आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांना नीट उत्तरे मिळत नसल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडेच तक्रारी केल्या.
गरीब विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीई अंतर्गत मोफत शाळा प्रवेश दिला जातो. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सुचना शासनाच्या आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात येते. अनेक जण चुकीची कागदपत्रे सादर करत असल्याने गरजुंना याचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेक पालक करतात. जिल्ह्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अखरेचा टप्पा सुरू आहे. त्यात जवळपास ४०० हून अधिक पालकांनी तक्रारी अर्ज सादर केले आहे. या तक्रारींची सुनावणी शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषदेत सुरू आहे सोमवारी केवळ ८८ तक्रारींवर सुनावणी झाली. ही प्रक्रीया संथ गतीने होत असल्याने जिल्ह्यातून लाबंवरून येणाऱ्या पालकांना हेलपाटे मारावे लागत ओहत. तसेच त्यांना योग्य उत्तरे अधिकारी देत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. तक्रारी निवारनासाठी केवळ एकच अधिकारी नियुक्त केलेला असल्याने आणि त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पालकांमध्ये देखील नाराजी आहे. या तक्रारींचा निपटारा तात्काळ करावा यासाठी खास अधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी पुढे आली आहे.
चौकट
अधिकारी नेमुन तक्रारींच्या सुनावण्या करा
जिल्हा परिषद सदस्य, वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके यांनी आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी करावी तसेच आलेल्या तक्रारींची सुनावणी खास अधिकारी नियुक्त करून वेळेत पूर्ण करावी, अशी सूचना केली. जुन्नर तालुक्यातील रा. प. सबनीस शाळेमध्ये अनेक श्रीमंतांच्या मुलांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिले आहेत. परंतु गरीब मुलांना डावलले जात असल्याबद्दल या शाळेतील प्रवेश प्रक्रिया यांची अधिकारी नेमून पडताळणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
चौकट
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात ९४३२ शाळांमध्ये १४ हजार ५५७ मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो. या वर्षी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जवळपास ६६ हजाराहून अधिक अर्ज आले होते. सर्व जागांवर विद्यार्थ्यांवर प्रवेश देण्यात आला आहे.